जितक्या आकृती, तितक्या प्रकृती !
विश्वात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मानवाच्या आवडी, निवडी, सवडी, स्वभाव, बुद्धी, विचारसरणी वेगवेगळ्या असतात. मानव प्राण्या संदर्भातील ही गोष्ट मला सर्वाधिक भुरळ घालते. आपल्या प्रत्येकामध्ये कमी-अधिक प्रमाणात, चांगले वाईट गुण असतातच, क्रांतिकारक ही त्याला अपवाद नाहीत. बऱ्याचजनांना खूप वेळ झोपायची किंवा एकदम गाढ झोपायची सवय असते. भारतीय स्वातंत्र्य युद्धातील अमर क्रांतिकारी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांनाही झोपायची भयंकर सवय होती. राजगुरूंच्या या सवयीचं वर्णन करताना शिव वर्मा म्हणतात___
“ जरा-सा मौका मिला नहीं की राजगुरू ने आँखें बंद कीं समझो | फिर किसकी मजाल थी की असानी से उसे उठा सके | ”
हुतात्मा राजगुरूंच्या भयंकर झोपण्याच्या सवयीचे काही प्रसंग खालीलप्रमाणे___
गोरखपुरमध्ये सरकारी खजिन्याच्या शोधात असतानाचा प्रसंग
काकोरी कांड नंतर संपूर्ण भारतभर बरेच क्रांतिकारक पकडले गेले, शस्त्रास्त्रे जप्त झाली. क्रांतिकार्यासाठी पुनः एकदा पैशांची कणकण भासू लागली. पैशांचा बंदोबस्त करण्यासाठी आजादांनी, भगतसिंग शिव वर्मा आणि राजगुरू या तिघांना ” गोरेखपूर ” येथे सरकारी खजिन्याचा शोध घेण्यासाठी पाठवले. चारही बाजूंना पोलिस आणि सी.आय.डी ऑफिसर्स दिवसरात्र क्रांतिकारकांच्या मागावर होतेच, त्यांपासून वाचण्यासाठी तिघांनी धर्मशाळेत न झोपता पाच रुपये महिना दारावर एक जूनं दुकान भाड्यावर घेतल. बऱ्याच दिवसांपासून बंद असल्याने दुकानाच्या आतल्या भागात बरीच घाण व जून समान साचल होत. गोरखपूर मध्ये केवळ ४-५ दिवसांचच काम असल्याने तिघांनीही साफसफाई करण्याचे कष्ट घेतले नाहीत. दिवसा शहरभरात विविध कार्यालये, बँका फिरायच आणि रात्री झोपण्यासाठी दुकानावर परतायच असा तिघांचा दिनक्रम चालू झाला.
एके दिवशी रात्री भगतसिंग, राजगुरू व शिव वर्मा जमिनीवर झोपले होते, तोच रात्री १-२ वाजता शिव वर्मांना कसलातरी आवाज ऐकू आला. बॅटरी चालू करून त्यांनी आवाजाच्या दिशेला पाहिल, तर राजगुरूच्या बाजूला एक नाग फना काढून फुत्कारताना दिसला. शिव वर्मांनी त्वरित बाजूला झोपलेल्या भगतसिंगांना जाग केल. भगतसिंगांनी राजगुरुला उठवायचा प्रयत्न केला, पण ते तर गाढ झोपेत, सुखाने घोरत होते. अखेर भगतसिंगांनी राजगुरूंचे दोन्ही पाय पकडले व दूर खेचून म्हणाले ” लवकर उठ ! तुझ्या डोक्याजवळ साप आहे. “
तिघांच्या या गदारोळाने साप घाबरून अंधारात गायब झाला पण, राजगुरूंना जाग काही आली नाही.
” मला त्रास देऊ नका, झोपूद्या” म्हणत कूस बदलून राजगुरू पुनः झोपी गेले.
सापाच्या भीतीने भगतसिंग आणि शिव वर्मा झोपू शकले नाही, आणि उरलेली रात्र त्यांनी गाढ झोपेत असलेल्या राजगुरुंवर नजर ठेवण्यात घालवली.
गोरखपूरहून बनारस जातेवेळीचा प्रसंग
भगतसिंग, राजगुरू आणि शिव वर्मा यांनी गोरखपुर मध्ये ४-५ दिवस सरकारी खजिन्याचा शोध घेतला, पण यश हाती आले नाही. शेवटी तिघांनी बनारस जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी ट्रेन यायला अजून उशीर होता, भगतसिंगांच्या मनात हलधर वाजपेयी, जे त्यावेळी गोरखपूर टेक्निकल स्कूल मध्ये शिकत होते, यांना भेटण्याची इच्छा प्रकट झाली. शिव वर्मा आणि भगतसिंग वाजपेयी यांना भेटायला जाणार, तर राजगुरू स्थानकावरील पुलाजवळ दोघांची वाट बघत थांबणार अस ठरल. काही वेळाने भगतसिंग आणि शिव वर्मा वाजपेयी यांना भेटून पुनः परतले, पण राजगुरू पूलाखाली नव्हते. दोघांनी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म, वेटिंग रूम, बाथरूम सगळीकडे शोधाशोध केली. ट्रेन सुटायला केवळ २० मिनिट बाकी राहिली, २-३ दा संपूर्ण गाडी ही तपासून पाहिली तरीही राजगुरू भेटेनात. सरतेशेवटी नाईलाजाने भगतसिंग आणि शिव वर्मा ट्रेनमध्ये सवार झाले. बनारस स्टेशनवर उतल्यावरही राजगुरुंची भेट न झाल्याने, दोघेही अधिकच चिंताग्रस्त झाले. गोरखपुर वरुण येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनमध्येही राजगुरू नाहीयेत हे पाहिल्यावर भगतसिंग आणि शिव वर्मा बनारस मध्ये सुरक्षित ठिकाणी जाण्यास निघाले.
दुसऱ्या दिवशी दुपारी भगतसिंग व शिव वर्मा यशपालच्या खोलीत बसले होते की तोच राजगुरू तिथे आले. येताच भगतसिंग व शिव वर्मा आपल्याला विना तिकीट एकटच सोडून आले, या कारणास्तव दोघांवर खूप भडकले. काही वेळाने त्यांचा राग शांत झाल्यावर,
” आम्ही तर सर्व स्थानकावर तुला शोधल होत, तू नेमका होतास कुठे ? ”
हा प्रश्न सर्वांनी विचारला. तेव्हा राजगुरू म्हणाले__
” गाडी सुटायला एक तास बाकी होता. इतका वेळ तिथे बसून- बसून मी की झक मारली असती का ? विचार केला एक तास झोपून घेऊ, म्हणून मी पुलाच्या बाजूलाच भिकाऱ्यांमध्ये चादर अंगावर घेऊन झोपलो होतो. तुम्ही दोघांनी मला उठवल का नाही ? “
भगतसिंग :- ” आम्हाला वाटल तुला पोलिसांनी पकडून नेल”
राजगुरू :- आपल्या कोटच्या आतून बंदूक काढत म्हणाले ” हा उपाय त्यासाठीच तर सोबत ठेवलाय”
शेवटी राजगरू सोबत वाद घालण्यात काहीच अर्थ नाही हे ध्यानात आल्याने भगतसिंग शांत झाले.
संदर्भ :-
१. संस्मृतियाँ – शिव वर्मा
२. क्रान्तिकारी आन्दोलन कुछ अधखुले पन्ने – धर्मेन्द्र गौड़
लेखनसीमा !
लेख आवडल्यास खालील आयकॉन वर क्लिक करून आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.
ALSO READ___
TAGS_____
#tigerday Astronomy azadi Azadi ke parwane Bhagat Singh Black Hole Chandrashekhar Azad Indian freedom fight Krantipathavaril Agni Shalaka Lokmanya Tilak Madan Lal Dhingra Rajguru SHIVAJI MAHARAJ Sukhdev Veer savarkar wari Women Freedom Fighters
आपल्या मित्रांसोबत भारतमातेच्या अमर सुपुत्रांबद्दलची अपरिचित माहिती शेअर करा.
शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.
Nice Information
Thank You !
👌👌👌
Thank You.
मस्तंच ! 😊😊
धन्यवाद.
मस्तच👌
धन्यवाद
खरंच हसू आलं… मस्त आहे लेख
आभारी आहे.
Bhari😅👌
धन्यवाद.