You are currently viewing मानवाची अवकाशझेप….

मानवाची अवकाशझेप….

हा उन्नती अवनतीस समुद्र जातो
भास्वान् रवीहि उदयास्त अखंड घेतो
उत्कर्ष आणि अपकर्ष समान ठेले
विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?

-स्वातंत्र्यवीर सावरकर

 खरंतर माणूस म्हणजे कल्पनाशिल प्राणी, आपल्या तल्लख बुद्धीच्याजोरावर विश्वातील घटकांचं निरीक्षण व अध्ययन करून त्यांच्या वापराचे नानाविविध प्रकार माणुस नेहमीच शोधत आलाय. आभाळात इकडून तिकडे मुक्तपणे स्वैरविहार करणाऱ्या पक्ष्यांना पाहून “आपल्यालाही अशीच आकाशाला गवसणी घालता यायला हवी, उडता यायला हवं” मानवालाही अशी इच्छा होणे हयात वावग नाही. प्राचीन इतिहासात डोकावून पाहीलं तर रामायणामधील लंकेपर्यंत झेप घेणारा हनुमंत, रावणाच पुष्पक विमान, पुराणकथांमध्ये आकाशात उडणारे देव-दानव किंवा ग्रीक पुराणातील डीडॅलस आणि इरॅकस ची कथा, सर्व मानवी कल्पनाविस्तराचाच एक भाग.

आपण सर्व एकविसाव्या शतकात राहतो, आजच्या घडीला मानवाने अवकाशात अध्ययनासाठी सोडलेल्या अवकाशयानांनी सुर्यमालेच्या सीमांचं ही सीमोल्लंघन केलंय. पण ही अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील गरुडझेप एकाएकी साध्य झालेली नसुन त्यामागे मनुष्याचे शतकानुशतकांचे कष्ट दडलेले आहेत.

●जमिनीवरून आकाशात झेप:-

 प्रत्यक्षात पाहिलं तर मानवाने आकाशात पहिलं उड्डाण केलं ते कुण्या पक्षासारखे पंख लावून नाही तर, गरम हवा थंड हवेपेक्षा हलकी असल्याने वातावरणात वरच्या दिशेला प्रवास करते या तत्वावर चालणाऱ्या भल्या मोठ्या हवेच्या फुग्याच्या साहाय्याने. इ.स १७८३ साली जूनमध्ये फ्रान्समधील जॅकवेस एटीन आणि जोसेफ या कागदाचा व्यापार करणाऱ्या दोन भावांनी मोठमोठे कागद जोडून भला मोठा फुगा बनवला. हा फुगा आकाशात ५१० मीटर उंच गेला, फुग्याला खाली एक टोपली लावली होती. टोपलीत एक शेळी,एक कोंबडा अन एक बदक ठेवले होते. थोडक्यात पंख नसतानाही आकाशात उंच उड्डाण करून पुन्हा जमिनीवर सुखरूप परत येण्याचा मान या तीन प्राण्यांना !

ऑक्टोबर १७८३ मध्ये याच दोन भवांनी बनवलेल्या कागदी फुग्याला जोडलेल्या टोपलीत बसून जीन फ्रॅन्सॉय पिलात्रे डी रोझियर या फ्रेंच डॉक्टरने उड्डाण करून “आकाशात उड्डाण करणारा पहिला मानव” हा सन्मान मिळवला.

Air Balloon चा पहिला प्रयोग 

पुढे Air Balloon च्या क्षेत्रात बरीच प्रगती झाली. हवाई प्रवासासाठी तसेच मालवाहतुकीसाठी Air Balloons चा वापर होऊ लागला याच काळात विमानाचाही शोध लागला. पण अजूनही मानवाचं पाऊल अवकाशात पडलं नव्हतं.

●आकाशातून अवकाशात झेप:-

१९वं शतक म्हणजे मानवी इतिहासातील सुवर्णकाळ. याच शतकात अल्बर्ट आईनस्टाईन, एडविन हबल तसेच अनेक वैज्ञानिकांनी ब्रम्हांडाची उत्पत्ती आणि सद्यस्थितीबद्दल अनेक सिद्धात मांडले. याच सिद्धांताच्या आधारे मानव अंतराळाचे रहस्य उलगडण्याच्या शोधात गुंतला. अमेरीकेची ‘नासा’ आणि रशियाची (सोव्हीएत संघ) ‘सोव्हिएत स्पेस प्रोग्राम’ या प्रतिष्ठित अशा अंतराळ संशोधन संस्थांमध्ये शर्यत सुरू झाली. मात्र बाजी मारली ती सोव्हीएत स्पेस प्रोग्रामनेच…!

४ ऑक्टोबर १९५७ मानवी इतिहासातील सोनेरी दिवस ठरला. रशियाने ‘स्फुटनिक-१’ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण करून इतिहास रचला. मात्र ही एक मानवविरहीत मोहीम होती. मानवाला अंतराळात पाठवणं त्याकाळी फार आव्हानात्मक होतं. म्हणुन मानव अंतराळात जीवंत राहु शकतो की नाही, याचा तपास करण्यासाठी वैज्ञानिक अनेक कीटक, प्राण्यांना रॉकेटच्या साहाय्याने अंतराळात पाठवू लागले. सर्वप्रथम २० फेब्रुवारी १९४७ रोजी अमेरीकेकडुन ‘V-2 रॉकेट’मधुन माशी (डिप्टेरा) या कीटकाला अंतराळात पाठवण्यात आलं. यानंतर १४ जुन १९४९ रोजी अल्बर्ट या माकडाला अंतराळात पाठवण्यात आलं. मात्र १३४ कीमी उंचावर गेल्यानंतर त्याचा मृत्यु झाला. नंतर रशियाने २२ जुलै १९५१ साली R-1 IIIA-1या फ्लाईटमधुन सायगन आणि डेझिक या कुत्र्यांना अंतराळात पाठवलं. ही मोहीम यशस्वी ठरली. आतापर्यंत अंतराळात पाठवण्यात आलेले सर्व प्राणी हे पृथ्वीच्या कक्षेच्या आतच पाठवले गेले होते. मात्र पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर एखाद्या प्राण्याला पाठवण्यासाठी रशिया आणि अमेरीकेत पुन्हा स्पर्धा सुरू झाली. रशियाने स्फुटनिक-१ च्या यशस्वी मोहीमेनंतर लवकरच दुसरी मोहीम आखली.

लायका

यावेळी ‘स्फुटनिक-२’ या उपग्रहातुन एखादा प्राणी पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेरही जिवंत राहु शकतो की नाही हे पाहण्यासाठी नवीन योजना आखली. त्यावेळी वैज्ञनिकांनी मॉस्कोच्या रस्त्यांवरुन एका भटक्या जमातीतील कुत्रीला आणण्यात आलं. तीचं नाव होतं ‘लायका’. त्यावेळी तीचे वय साधारण तीन वर्ष होतं. इतिहासात पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाणारी ती पहीलीच जीव ठरणार होती. मात्र तिच्यासाठी बनवण्यात येणार विशेष स्पेसक्राफ्ट अवघ्या ४ आठवड्यांमध्ये बनवण्यात आला होतं. आणि हीच घाई तिच्या जिवावर बेतली. या स्पेस क्राफ्टमध्ये तिला श्वास घेण्यासाठी कार्बन डाय ऑक्साईड एब्जॉर्बर आणि ऑक्सिजन जनरेटर तसेेेच यातील वातावरण थंड राहण्यासाठी एक पंखा बसवण्यात आला होता. तसेच सात दिवस जिवंत राहण्यासाठी काही कुत्र्यांचे खाद्यही ठेवण्यात आलं. भटक्या कुत्र्यांना कोणत्याही वातावरणात वावरण्याची सवय असते. त्यामुळे या मोहीमेसाठी लायकाची निवड करण्यात आली. या स्पेस क्राफ्टचं केबिन इतकं लहान होतं की यात फीरण्यासाठीही जागा नव्हती. म्हणजे पुर्ण मोहीमेच ती एकाच जागी राहणार होती. २८ दिवसांत स्फुटनिक-२ तयार झाला होता. यानंतर अंतराळात पाठवण्यासाठी लायकाला प्रशिक्षण देण्यात आलं. एकाच जागी निरंतर बसण्याची सवय व्हावी यासाठी तिला २० दिवस एका पिंजऱ्यात डांबुन ठेवण्यात आलं. आता ती अंतराळात जाण्यासाठी पुर्णपणे सज्ज झाली होती. त्यावेळी वैज्ञानिकांना रॉकेट स्पेसमध्ये पाठवण्याचे तंत्र अवगत होते, मात्र परतुन येण्याबद्दल काहीच माहीत नसल्याने या मोहीमेसाठी प्राण्याची निवड करण्यात आली. म्हणजेच ही एक सुसाईड मोहीमच होती. मोहीमेच्या काही दीवसांपुर्वी एका शास्त्रज्ञाने लायकाला काही दिवस तिच्या पिल्लांसोबत राहण्याची संधी दीली. यानंतर लायकाला स्फुटनिक-२च्या केबिनमध्ये तीन दिवस तसेच ठेवण्यात आलं, कारण तिला अशा रीतीने बसण्याची सवय व्हावी.

अन् तो दिवस जवळ आला. ३ नोव्हेंबर १९५७… लायकाला स्फुटनिक-२च्या केबिनच्या आत बांधण्यात आलं. केबिन बंद करण्यापुर्वी स्पेस क्राफ्ट बनवणाऱ्या एका तंत्रज्ञाने तिला गोंजारुन अखेरचा ‘गुड बाय’ केला. स्फुटनिक-२ लायकासह यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला. लायका कक्षेबाहेर जाणारी इतिहासातील पहिलीच जीव ठरली. मात्र तांत्रिक बिघाडामुळे स्फुटनिक-२ चा एक भाग अंतराळात वेगळा होऊ शकला नाही. स्पेसक्राफ्ट अवघ्या चार आठवड्यांमध्येच बनवणं योग्य नव्हतं त्यामुळे लायकाच्या केबिनचं तापमान जास्त वाढु लागलं. अन् लायकाच्या हृदयाचे ठोके पहील्याहुन जास्त प्रमाणात वाढले. उष्णतेचं प्रमाणं वाढल्यामुळे तिला फार वेदना सहन कराव्या लागत होत्या. प्रक्षेपण झाल्यापासुन तीन तास ती मृत्युशी झुंज देत होती. पाच तासानंतर केबिनचं तापमान इतकं वाढलं की तिच्या सेंसरमधुन सिग्नल येणं बंद झालं होतं. आणि यासोबच अवघ्या काही तासांमध्येच पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर पडल्यानंतर लायका मरण पावली. तिच्या मृत्युनंतरही स्फुटनिक-२ १६२ दिवस अंतराळात भ्रमण करत होता. पृथ्वीला तब्बल २५७० प्रदक्षिणा घातल्यानंतर १४ एप्रिल १९५८ रोजी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच आत मरण पावलेल्या लायकासह त्याचा स्फोट झाला. २००८ साली लायकाच्या सन्मानार्थ रशियन शासनाने तीचं स्मारक बनवलं. लायका जरी एक प्राणी असली तरीही तीच्या या अभुतपुर्व योगदानाचा मानवाला विसर पडला नाही पाहीजे. पृथ्वीच्या कक्षेबाहेर तिच्याकडुनच मिळालेल्या काही सिग्नल्समुळे आज मानव मोठमोठ्या अंतराळ मोहीमा यशस्वीरित्या पार पाडत आहे. मानवाला विज्ञानात प्रगत होण्यासाठी अनेक प्राण्यांनी बलिदान दिलं आहे. या मोहीमेत मानवाच्या स्वार्थापोटी एका प्राण्याने आपल्या प्राणांची आहुती दिली. मात्र मानवाच्या मनात आजही लायकासारख्या प्राण्यांची काहीच लायकी नाही.

लायकाचं स्मारक – रशिया

लेखनसीमा !


लेख आवडल्यास खालील आयकॉन वर क्लिक करून आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.


ALSO READ___


TAGS_____

#tigerday Astronomy azadi Azadi ke parwane Bhagat Singh Black Hole Chandrashekhar Azad Indian freedom fight Krantipathavaril Agni Shalaka Lokmanya Tilak Madan Lal Dhingra Rajguru SHIVAJI MAHARAJ Sukhdev Veer savarkar wari Women Freedom Fighters


आपल्या मित्रांसोबत खगोलशास्त्राबद्दलची अपरिचित माहिती शेअर करा.

शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.

Infinity_peace_007

ज्ञानाच्या अथांग महासागरातील जे ओंजळभर ज्ञात आहे, त्यातीलच काही थेंब रीते करण्यासाठी हे शब्दबिल्व !
Subscribe
Notify of
guest
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौरभ
सौरभ
3 years ago

मस्तंच !