You are currently viewing हुतात्मा चंद्रशेखर आजादांची दुर्मिळ छायाचित्रे

हुतात्मा चंद्रशेखर आजादांची दुर्मिळ छायाचित्रे

The longer you look back, the farther you can look forward.

– Winston Churchill

विन्स्टन चर्चिलचं हे साधं, सोपं वाक्य पण किती मोठा अर्थ दडलाय वाक्यात. आपल्या राष्ट्राचा इतिहास का वाचावा ?
या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी निव्वळ हे एक वाक्य पुरेसं आहे. इतिहास वाचावा तो सर्वप्रथम प्रेरणा घेण्यासाठी, ज्या चुका इतिहासात घडल्या आहेत त्यांची पुनरावृत्ती न व्हावी ह्या अनुषंगाने चुका दुरुस्त करण्यासाठी. थोडक्यात राष्ट्राची वर्तमान पिढी घडवायची असेल तर, इतिहासाची गोडी असणे अत्यंत आवश्यक हाच काय तो ह्या सर्वातला मूळ बोध !

आपल्या स्मृतींनी “दुर्लभं भारते जन्म:” म्हंटल आहे. भारतमातेसाठी प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या नरवीरांची अन या नरवीरांना आपल्या उदरी जन्मदेणाऱ्या वीर-मातांची भारतीय मातीला कधीच कमी पडली नाही. इतिहासातील प्रत्येक कालखंडात, मातृभूमीच्या पुण्य वेदीवर असंख्य युवकांनी आपल्या रक्ताचा अभिषेक करून, भारतमातेची कुस पावन केली आहे. भारताच्या जाज्वल्य इतिहासातील एक सुवर्णपान म्हणजे, ब्रिटिश शासन काळातील भारतीय सशस्त्र क्रांतीचा इतिहास अर्थात भारतीय स्वातंत्र्यसमर.

हा जाज्वल्य इतिहास ज्यांनी आपल्या नावे केला ते वेडे म्हणजे “क्रांतिकारक”

हो देशभक्तांना मी वेडंच म्हणतो, कारण मातृभूमीसाठी सुख, चैन, पैसा, पद, प्रतिष्ठा सर्वांचा त्याग करून आपलं जीवनपुष्प देशसेवेसाठी अर्पण करुण हे कुण्या शहण्याचं काम तर नव्हेच !

ही कामे करावी ती देशभक्त वेड्या वीरांनीच, त्यामुळं हा वेड्यांचाच इतिहास !

भारतीय स्वातंत्र्ययुद्धातील मेरूमणी म्हणजे चंद्रशेखर आजाद. चंद्रशेखर आजाद हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन(HSRA) या क्रांतिकारी दलाचे चीफ कमांडर होते. काकोरी कांड, लाहोर कट, व्हॉईसरॉय वर हल्ला, संसदेत बॉम्ब हल्ला अशा कितीतरी क्रांतिकारी कारवायांमध्ये ते सामील होते. क्रांतिकारकांबद्दल बरीच माहिती उपलब्ध होते. खंत वाटते ती एकाच गोष्टीची की, सर्व क्रांतिकारकांची खूप कमी छायाचित्रे उपलब्ध आहेत, या परिस्तिथीला कारणही तितकंच समर्पक आहे. क्रांतिकारक स्वतःच छायाचित्र काढून घेत नसत कारण, त्याचा वापर पोलीस प्रशासन त्यांची ओळख पटवण्यासाठी करू शकत होतं, याकारणास्तव जवळपास सर्वच क्रांतिकारकांची हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच छायाचित्रे उपलब्ध आहेत किंवा जी छायाचित्रे उपलब्ध आहेत ती कैद झाल्यावर काढण्यात आली आहेत. चंद्रशेखर आजाद यांची सुद्धा केवळ 2 चं छायाचित्रे उपलब्ध आहेत. खरंतर वर उल्लेखिल्या प्रमाणे इतर क्रांतिकारकांप्रमाणेच चंद्रशेखर आजादांचाही छायाचित्र काढून घेण्यास तीव्र विरोधच होता, पण त्यांच्या आयुष्यात असाही एक क्षण आला की ज्यावेळी आपलं छायाचित्र काढून घेण्याचा मोह आजाद आवरू शकले नाहीत. हा प्रसंग आजाद काकोरी कांड मध्ये मुख्य आरोपी असल्याने फ़रारी होते तेव्हाचा आहे.

९ ऑगस्ट १९२५ रोजी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन च्या क्रांतिकारकांनी काकोरी स्टेशनजवळ ट्रेन लुटली,क्रांतिकारकांची ही लूट इतिहासाच्या पानावर काकोरी कांड(kakori conspiracy) नावाने ओळखली जाते. काकोरी कांड मध्ये समाविष्ट असणारे जवळपास सर्वच क्रांतिकारी पोलीसांच्या हाती लागले पण, आजाद मात्र पोलिसांच्या हाती लागले नाही. काकोरी कांड नंतर काकोरी येथून फरार होऊन ते झाशीस आजाद मास्टर रुद्रनारायणांकडे ‘हरिशंकर’ नावाने त्यांचा छोटा भाऊ म्हणून राहू लागले.

असंच कुण्या एकेदिवशी मास्टर रुद्रणारायन यांच्या घरी आजाद नुकतेच अंघोळ आटोपून बाहेर पडत होते तोच मास्टर रुद्रणारायण तेथेच कॅमेरा घेऊन काहीतरी काम करत होते. चंद्रशेखर आजादांना पाहताच मास्टरजी आजादांना म्हणाले “अरे आज तु आपला फोटो मला काढू दे ना.” सहजच आजादांनी मास्टरजींना त्यांनी फोटो काढण्यास आपली संमती दर्शवली. आणि “मला माझ्या मिश्या तर नीट करू द्या” म्हणत त्यांनी आपला डाव्या हाताने मिशीवर ताव दिला. अगदी त्या क्षणीच आजादांचा फोटो काढण्यासबंधी विचार पुन्हा बदलला तर अशी संधी पुन्हा मिळणार नाही, हे जाणून असल्याने मास्टरजींनी लगोलग ती मुद्रा कॅमेऱ्यात कैद केली. या छायाचित्राचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात आजादांच्या बाजूला त्यांचं पिस्तुल ही ठेवलेलं आहे, या पिस्तूलाला ते “बमतुलबुखारा” म्हणत.

.

पुढे अजून एके दिवशी मास्टर रुद्रणारायनानीं आजादांचा आणखी एक फोटो घेतला पण ह्यावेळी आजादांसोबत मास्टर रुद्रणारायन यांच्या धर्मपत्नी “मुन्नी देवी” अन दोन मुली सुद्धा होत्या.

.

आजादांचे हे फोटो घेण्यामागे मास्टरजींचा हेतू मात्र निर्मळ होता, उद्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त होईल पण त्यावेळी देशासाठी आपलं घर, दार, सुख, संसार वाऱ्यावर सोडलेली ही क्रांतिकारक मंडळी कदाचित ते स्वातंत्र्य पाहायला जिवंत असेल की नसेल ह्याची शाश्वती मात्र नव्हती. देशाच्या येणाऱ्या पिढीला हे क्रांतिकारक दिसायला कसे होते हे कळावं ह्या हेतूने मास्टरजींनी ही छायाचित्रे काढली होती.

पुढे काही काळाने आजाद झाशी मधूनही फरार झाले. पुढे १९२९ मध्ये कानपुर ला असतान, त्यांना ह्या फोटोंची आठवण झाली. त्यांनी विश्वनाथ वैशंपायन या आपल्या क्रांतिकारी मित्राला, झाशी येथे मास्टर रुद्रणारायन सिंह ह्यांच्या घरी फोटो प्लेट तोडण्यास धाडले. पहिल्या वेळी तर आजादांच्या परवानगीने कुणी त्यांचा फोटो काढलाय ही गोष्ट वैशंपायन ह्यांना पटलीच नाही पण जेव्हा ते म्हणाले_ “मास्टरजींनी माझे दोन फोटो काढले आहेत, माहीत नाही मी कसा त्यांच्या जाळ्यात अडकलो अन स्वतःचे फोटो काढून घेतले.” दुसऱ्या दिवशी विश्वनाथ वैशंपायन झाशीला मास्तर रुद्रणारायन ह्यांच्या निवासस्थानी पोहोचले व त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्यावेळी झाशी मध्ये केवळ दोनच फोटोग्राफर होते एक दत्तूराव अन दुसरे मास्टर रुद्रणारायन सिंह. मास्टरजी दोन्हीही फोटों असलेली काचेची प्लेट घेऊन आले( त्याकाळी फोटो चे निगेटिव्ह काचेच्या प्लेट वर अंकित केले जायचे).

मास्टरजी वैशंपायन ह्यांना म्हणाले “आज आपण ह्या काचेच्या प्लेट फोडून टाकल्या तर येणाऱ्या पिढ्या चंद्रशेखर आजादांच्या प्रतिमेसाठी तरसून जातील” . मास्टरजींचा मुखातून वरील बोल ऐकताच वैशंपायन असमंजस्यात पडले, शेवटी मास्टरजींनीच ह्यातून तोडगा काढला, ते वैशंपायन यांना म्हणाले “आपण ह्या काचा तुमच्या पुढ्यातच भिंतीत लिपुन टाकू व तुम्ही त्या फोडून आलो, असं आजादांना सांगा. जेणेकरून त्यांची आज्ञा ही तुम्ही ऐकली असं त्यांना वाटेल व फोटोही चुकूनही कुणाच्या हाती लागणार नाहीत पण भावी काळासाठी चित्रे संवर्धित राहतील नाहीतर कदाचित भविष्यात या फोटोंसाठी रडत बसावं लागेल.” विश्वनाथ वैशंपायन ह्यांनी ह्यास मान्यता दिली अन हुतात्मा चंद्रशेखर आजादांची ही छायाचित्रे भावी पिढ्यांसाठी सुरक्षित झाली.
(वरील प्रसंग स्वतः विश्वनाथ वैशंपायन ह्यांनी कथित केला आहे)

जय हिंद !
वंदे मातरम !!
भारत माता की जय !!!!

संदर्भ:-

●चंद्रशेखर आझाद और उनके दो गद्दार साथी-धर्मेंद्र गौड़
●वडवानल:- वि.श्री.जोशी

#india #indian_freedom_fight #revolution #freedom_fighters #azad #chandrashekhar_azad #indian_history #history #azadi_ke_parwane #indianhistory #freedomfighter #inqulab_jindabad

लेखनसीमा !


लेख आवडल्यास खालील आयकॉन वर क्लिक करून आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.

0
Please leave a feedback on thisx


ALSO READ___


TAGS_____

#tigerday Astronomy azadi Azadi ke parwane Bhagat Singh Black Hole Chandrashekhar Azad Indian freedom fight Krantipathavaril Agni Shalaka Lokmanya Tilak Madan Lal Dhingra Rajguru SHIVAJI MAHARAJ Sukhdev Veer savarkar wari Women Freedom Fighters


आपल्या मित्रांसोबत भारतमातेच्या अमर सुपुत्रांबद्दलची अपरिचित माहिती शेअर करा.

शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.

Infinity_peace_007

ज्ञानाच्या अथांग महासागरातील जे ओंजळभर ज्ञात आहे, त्यातीलच काही थेंब रीते करण्यासाठी हे शब्दबिल्व !
Subscribe
Notify of
guest
8 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
रोहन गाडे
रोहन गाडे
3 years ago

आपण आपल्या लिखाणातून त्या प्रसंगांचे खूप छान वर्णन केले आहे.👍

कल्पेश शेलार
कल्पेश शेलार
3 years ago

सरळ सोप्या भाषेत खुप छान मांडणी केली आहे, माहिती 👌🏼👌🏼👌🏼👌🏼

Suraj. Narsale
Suraj. Narsale
3 years ago

Mast explain kelays💯👌👌

Last edited 3 years ago by Suraj. Narsale
trackback

[…] हुतात्मा चंद्रशेखर आजादांची दुर्मिळ … […]

trackback

[…] हुतात्मा चंद्रशेखर आजादांची दुर्मिळ … […]